Tuesday, February 16, 2010

प्रेम...

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं


कवी - सुधीर मोघे

Friday, December 18, 2009

परिक्षा

कॉलेजमध्ये आमच्या वर्गात चार अतिशय व्रात्य मुले होती.
चाचणी परिक्षेच्या अगोदर चौघेही रात्री बर्‍याच वेळ खेळत होते. दुसर्‍या दिवशी परिक्षे आधि चौघेही प्राचार्यांकडे फारच खराब झालेले घाणेरडे कपडे घालून गेले व काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो व परत येताना आमच्या कारचे टायर फुटल्याने आमची ही अवस्था झाली आहे असे प्राचार्यांना सांगितले.
प्राचार्य म्हणाले बर पण चारच दिवसांनी मी तुमची चौघांची चाचणी घेणार. असे ऎकून मुले फार खुष झाली.
चौथ्या दिवशी चौघेही परिक्षेला गेले.
प्राचार्य त्यांना म्हणाले ही परिक्षा मी काही परिस्थीती मुळे पूढे धकलली आता तुम्ही तयारी करुन आला असाल तर मी परिक्षा घ्यायला तयार आहे. पण चौघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवणार व फक्त दोनच प्रश्न विचारणार.
दोनच प्रश्न ऎकून मुलांना आनंद झाला.
मुलांना चार खोल्यात बसवण्यात आले व प्रश्नपत्रिका देण्यात आली.
त्यातील प्रश्न होते.

प्रश्न १ तुमचे नाव काय आहे ? (०४ गुण)
प्रश्न २ तुमच्या कारचा कोणता टायर फुटला होता ? (९६ गुण)
अ. समोरचा डावा.
ब. समोरचा उजवा.
क. मागचा डावा.
ड. मागचा उजवा.

Search This Blog

Loading...